Monday 15 January 2018

अनमोल नजराणा

 "अनमोल नजराणा"   माझ्या फुलोरा या काव्य संग्रहातून 

नऊ  महिने  आईच्या उदरात 

तुम्ही मला सुरक्षा आणि उब दिली ..
प्रसूतीपूर्व काळजी घेऊन , डॉक्टर 
मला जगविण्याची पराकाष्ठा केली .

माझ्या हृदयाचे ठोके तुम्हाला ऐकविताना 
मला जाणवत होता ..
तुमच्या हाताचा प्रेमळ स्पर्श  ..  
आणि   माझ्या  मातेच्या चेह-यावर 
फुललेले प्रसन्नतेचे हास्य  ....!!   
 आहार , औषधं , इंजेक्शनं आणि 

तळमळीनं  काळजी  करून 
माझ्या उदरप्रवासात तुम्ही पाहिलंत 
माझी हालचाल वाढ आणि 
कसं  होईल माझं योग्य वजन   ?
आईच्या उदरात गेलो होतो   
मी अगदीच अवघडून    
नऊ महिने एकाच जागी 
हात पाय आणि मान दुमडून
इथंच असं तर जगात माझं होईल कसं  ? 
पण माझ्या या भीती ला .. 
तुम्ही लावलंत पार पळवून

तुमचा आत्मविश्वास अनुभव आणि ज्ञान   
तुम्ही कण कण झिजलात डॉक्टर 
तुमचा अमूल्य वेळ देऊन 
दिलंत मला जीवनदान  !! 
मी हॊईन मोठा आणि मिळवीन अनेक मित्र 
पण खरंच डॉक्टर तुम्ही आणि तुम्हीच फक्त 
राहाल माझा पहिला खरा मित्र  !!
दिवस आणि वर्षे येतील आणि जातील 
पण तुम्ही जिकिरीने मला जगवलंत ..
  मी नक्कीच राहीन जिवंत 
सुदृढ आणि सशक्त .
   आज माझ्या जन्म दिवशी
मी देतो आहे एक वचन .
 जीवनदायी तुम्ही म्हणून तुमच्या 
कर्तव्यदक्षतेचा वारसा घेऊन 
हेच सांगतो कि डॉक्टर 
हाच वारसा जपीन ..तुम्ही केलेलं माझ्यासाठी 
... न जाता विसरून !! 
जीवन जगविण्याची हि कला 
मी अंगी बाणवून घेईन 
माणूस म्हणून जगताना 
माणुसकी नक्कीच जिवंत ठेवीन !! 
नुकताच जन्मलेला मी .. 
" एक बाळ " 
 डॉ वंदना गांधी यांच्या 
फुलोरा या काव्य संग्रहातून 
१२ मे २०११












Wednesday 13 April 2011

Me Ek Sabala

मी आजपासून मराठीतून  स्त्री च्या मनाची,  संवेदनांची , एक हळूवार उकल करणारी ब्लॉक मालिका या माध्यमातून लिहिणार आहे . वाचक हो , मग तुम्ही ही  म्हणाल, होय तू एक सबलाच .!! स्त्री ला जगवा . तरच हे  जग जगेल. 
मग भेटूया इथेच .. मी एक सबला   मध्ये .    डॉ. वंदना गांधी .